- ध्द्धवॉक इन इंटरव्हुला जाऊन बघायला पाहिजे.
ऐनवेळीच्या मुलाखतीला जाऊन बघायला हवे. - एटियम मधून पैसे घेऊन येतो.
सुलभ धनालयातून पैसे घेऊन येतो. - काल आपले बॅडलक होते, अकारणच रन आऊट आणि एल्बीडब्लु झाले.
काल आपले नशीब खराब होते - अकारण धावबाद व पायचित झाले - माझ्या ट्र्व्हेलिंग किट मध्ये शेव्हिंग किट ठेवशील.
प्रवासाच्या सामानांत, दाढीचे साहित्य ठेवशील - माझा पत्ता, श्री अपार्टमेंट, सहजीवन कॉलनी, असा आहे.
माझा पता, श्री इमारत, सहजीवन गृहसंकुल असा आहे. - गॅस सिलेंडरची नळी बसवली का? व्हॉल्व बंद कर बरे का?
वायुइंधन टाकीची नळी बसवली का? झडप बंद कर बरे का ! - क्लिनिक मध्ये जायचे आहे, सध्या प्रॅक्टिस बरी चालली आहे.
दवाखान्यात जायचे आहे, सध्या कामकाज बरे चालले आहे. - सध्या बायपास आणि ऱ्हदयातील ब्लॉकस् चे प्रमाण वाढले आहे बरे!.
सध्या .......... आणि हृदयातील गुठळ्यांचे प्रमाण वाढले आहे बरे ! - तो फारच मॅनर्सलेस आहे.
तो फारच अशीष्ठ आहे. - सारेगम स्पर्धेत एसएमएस नि बराच बदल केला.
सारेगम स्पर्धेत लघूसंदेशांनी बराच बदल केला. - विज टंचाईच्या काळात जनरेटर्स आणि इन्वर्टरचा विचार केला पाहिजे.
विज टंचाईच्या काळात विद्युतजनित्रे आणि विद्युतसंचके ह्यांचा विचार केला पाहिजे.