वॉक इन इंटरव्हुला जाऊन बघायला पाहिजे.

आत चालत मुलाखतीस जाऊन बघायला पाहिजे.:)
सर्वासाठी खुल्या मुलाखतीस जाऊन बघायला पाहिजे

एटियम मधून पैसे घेऊन येतो.
अटम मधून पैसे घेऊन येतो. हा शब्द रूढ करावा.

काल आपले बॅडलक होते, अकारणच रन आऊट आणि एल्बीडब्लु झाले.
काल आपले नशीबच वाईट होते, अकारणच धावचित आणि पायचित झाले.

माझ्या ट्र्व्हेलिंग किट मध्ये शेव्हिंग किट ठेवशील.

माझ्या प्रवासी बटव्यामध्ये दाढीचे सामन ठेवशील.

माझा पत्ता, श्री अपार्टमेंट, सहजीवन कॉलनी, असा आहे.
माझा पत्ता श्री इमारत, सहजीवन वसाहत असा आहे.

गॅस सिलेंडरची नळी बसवली का? व्हॉल्व बंद कर बरे का?
वायू नळकांड्याची नळी बसवली का? दुतोंड्या बंद कर बरे का?:)

क्लिनिक मध्ये जायचे आहे, सध्या प्रॅक्टिस बरी चालली आहे.
रुग्णवाटिकेमध्ये जायचे आहे, सध्या बरी तेजी सुरू आहे.

सध्या बायपास आणि ऱ्हदयातील ब्लॉकस् चे प्रमाण वाढले आहे बरे!.
सध्या हृदयातील वाहिनी अडथळे व त्यावरील शस्त्रक्रियेचे प्रमाण बरेच वाढले आहे बरे. 

तो फारच मॅनर्सलेस आहे.
तो फारच सभ्यतेविना आहे:)
तो फारच असभ्य आहे.

सारेगम स्पर्धेत एसएमएस नि बराच बदल केला.
सारगम स्पर्धेत लेखी लघुसंदेशांनी बराच बदल केला

विज टंचाईच्या काळात जनरेटर्स आणि इन्वर्टरचा विचार केला पाहिजे. 
विज टंचाईच्या काळात वीजनिर्माणयंत्रे आणि वीजप्रवाहदिशा विरुद्धके ह्यांचा विचार केला पाहिजे.:)