लेख आवडला, वेगळा आणि माहितीपूर्ण आहे परंतु इड, इगो आणि सुपर‌इगोबद्दल आणखी काही भागांत विस्तृत लिहिता येईल का? वाचायला नक्की आवडेल.

मनाची एक आठवण म्हणजे, एकदा शाळेत काहीतरी मनावरून विषय निघाला तेव्हा 'हे मन... मन म्हणतो आपण ते माणसाच्या शरीरात नक्की कोठे असते?' असा खोचक प्रश्न आम्हाला बाईंनी विचारला. मन डोक्यात असते, मन हृदयात असते असे बऱ्याचजणांचे म्हणणे पडले. एका मैत्रिणीने 'मन गळ्यात असते' असे सांगितले का तर मनातले विचार बोलून दाखवता येतात.  

प्रियाली.