बऱ्याच इंग्रजी शब्दांचे प्रतिशब्द मूळ शब्दापेक्षा कठिण वाटतात,अशा ठिकाणी तेच शब्द ठेवणे योग्य.मात्र जेथे मूळ मराठी शब्द उपलब्ध आहेत तेथे मात्र तेच वापरण्याचा आग्रहच धरला पाहिजे.या भागातील शब्दांचा विचार केल्यास  लॅपटॉप ,पॅनकार्ड,हेडलँप ,टेललॅंप, झेरॉक्स  गॉगल्स येवढेच शब्द मूळ मराठीत नाहीत.त्यातही हेडलँप ,टेललॅंप याना पुढील आणि मागील दिवे  असा साधा पर्याय वापरावा उगीचच पार्श्वदीप वगैरे वापरून भाषेचा अवघडपणा वाढवू नये.