सौरभी,

लहानपणी कोल्हापूरला आजोळी जायचो त्यावेळी गल्लीत कोणी नवी नवरी माहेरी जाऊन सासरी परत आली (किंवा माहेराहून तिला कोणी न्यायला आले?) की बरोबर शिदोरी म्हणून बूट्टी भरून भाकरी आणि पाटवड्या आणायची. ही शिदोरी शेजारीपाजारी वाटण्याची पद्धत होती. आजीकडे नेहेमी कोणी ना कोणी शिदोरी देवून जायचे. मला भयंकर आवडायच्या या वड्या. त्यांची चव खासच असायची. तोंडाला पाणी सुटते आठवणीने. बऱ्याच वर्षांपूर्वी मीही इकडे एकदा मराठी मंडळींच्या मेजवानी मधे बनवून नेल्या होत्या. ठीक ठीकच होत्या, पण तरीही हिट झाल्या. बऱ्याच दिवसांनी आपण आठवण करून दिलीत. पून्हा करेन.

माझी आई आधी फोडणी करून त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, धणे-जिरे पावडर घालून आणि पाणी टाकून उकळी आणत असे आणि मग त्यात चण्याचे पिठ टाकून शिजवत असे. अशाने वड्या जास्त खमंग होतात असे तिचे म्हणणे होते. मी तशाच केल्या होत्या. तुमच्या पद्धतीनेही करून पाहीन आता.

- (प्रभावित) सीमा