प्रमोद......तुम्ही म्हणताय त्यातलं थोडंफ़ार खरंय . ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याची संपूर्ण माहिती मुलाखातकाराला असणं अतिशय गरजेचं असतं. मुलाखती आधीच ध्वनीमुद्रीत होतात अन मगच त्याचं प्रसारण होतं. माझा अनुभव मजेशीर आहे.
एकदा टिव्हीवर एका स्वातंत्र्य सैनिकाची मुलाखत मी भगवान परब ह्यांच्या दिग्दर्शनाखाली घेत होते. पहिल्यांदा जुजबी ओळख झाल्यानंतर मुलाखतीला सुरवात झाली. बाजूलाच ज्ञानेश्वरांचा फ़ोटो आणि त्याच्यासमोर उदबत्ती लावली होती. मुलाखत ध्वनीमुद्रीत होत असताना.... थोडा तांत्रिक प्रॉब्लेम झाला. पण संभाषणाची लिंक तुटू नये म्हणून आम्ही पुन्हा पहिलेपासून सुरवात केली. नंतर मधेच लक्षात आलं की उदबत्ती कधीच संपली होती आणि फ़क्त राख दिसतेय. मग काय...... पुनश्च हरि ओम......!
अशा मज्जा मज्जा होतात