वरील प्रतिसादात भ्रमणध्वनीचे उदाहरण दिलेले आहे. वातावरणातील सगळ्याच लहरी भ्र.ध्व‌.संचावर आदळत असतात. त्यातील मंडले (सर्किटस) त्यातल्या कुठल्या लहरी आपल्या ते ठरवतात आणि त्याप्रमाणे आपल्या कानात आवाज ऐकवतात. ह्या लहरी थेट मेंदूलाच जोडाव्यात अशा तऱ्हेचा विचार मांडणारा एक लेख मी वाचला होता. अगदी हल्लीच ही बातमी* बघितली की काही मंडलांची एक चीप डोळ्यात बसवून त्यातून मिळणारे दृष्य विद्युत लहरी वापरून थेट मेंदूला जोडण्याचे काम करण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळवले आहे.

भानुदास या गृहस्थांविषयी मी लहानपणी बरेच ऐकले होते. अंनिसच्या 'भंडाफोड' कार्यक्रमाला गेलेल्या लोकांचे अनुभव ऐकायला मिळाले होते. त्यावरून ते वैज्ञानिकांपासून दूरच पळतात असे वाटले होते.

* बातमीचा दुवा देण्याचा प्रयत्न फसला. बीबीसीच्या संकेतस्थळावर जाऊन बायोनिक आय इंप्लांट (bionic eye implant) असे शोधावे व १६ फेब्रुवारीची बातमी बघावी.