आज़वरच्या तुमच्या सगळ्या विडंबनांमध्ये हे सगळ्यात जास्त आवडले. सगळेच शेर छान आहेत. मूळ गझलेच्या वाचनानंतर तिने निर्माण केलेल्या वातावरणात या विडंबनाची मजा अनुभवणे हा माझ्यासाठी एक विशेष अनुभव होता.
मतला, अशुद्ध पाणी नि खीर विशेष आवडले. विडंबनामधील कल्पनावैविध्य प्रशंसनीय आहे. अशीच चांगली विडंबने तुमच्या हातून घडोत, ही शुभेच्छा.
भिस्त मधला भि हृस्व राहिला असता, तरी चाललेच असते.