प्रियाली,
आपण लिहिल्याबद्दल धन्यवाद. पहिल्या प्रतिसादात लिहायचे राहून गेले होते. म्हणून हा पुन्हा प्रपंच.
मी त्या लेखकाशी दूरध्वनीवर संभाषण केले. त्यांच्याकडे त्यांच्या मूळ पुस्तकाची प्रत सध्या उपलब्ध नाही. पण झेरॉक्स प्रत देण्याचे कबूल केले आहे. ज्यावरून त्यांच्या लिखाणाचे मूळ स्त्रोत, प्रेरणा आणि आधार यांचा मागोवा घेता येईल. एक मनोगती मित्र त्यांना पूर्वीपासून ओळखतात. ते त्यांच्याकडे जाऊन त्यांना मनोगतवरील लिखाण / चर्चा यांची छापील प्रत देऊन त्यांचा अभिप्राय कळवतील अशी आशा वाटते.