उदा.
काळ्या मण्यात वृत्ती बंदिस्त होत नाही
हा काळा मणी आणि वृत्ती म्हणजे काय? जादूटोण्याशी शेराचा संबंध आहेशी शंका आहे. काळा मणी म्हणजे डोळे काय?तसेच पृथगात्मता सारखे शब्द वाचताना मन तादात्म्य पावत नाही. मला वेगळा विदर्भ दिसू लागला. पण ह्या शेरात वेगळेपणा जपणे कदाचित जमणारे नसावे.
असो. गझल छान आहे. आवडली. वाचकांना विभावरी आवडते हे खरे. काही म्हणतीलही "कुठून कुठून कित्ती सुंदर शब्द वापरतात!" पण सुंदर बाईला आपले सौंदर्य ठसविण्यासाठी नट्टाफट्टा करण्याची गरज नसते. नकटीने कितीही हिरेजडित नथी घातल्या तरी तिचे नकटेपण फार काळ लपत नाही. आणि हे आम्हा सर्वांनाच लागू असावे.
चित्तरंजन