प्रतिसादाचे किंवा व्य. नि. चे शीर्षक लिहून जर टॅबची कळ दाबून मजकुराच्या खिडकीत कर्सर( याला मराठीत काय म्हणावे?) आणला तर बरेचदा रोमन अक्षरे प्रकट होतात. आजच एक व्य नि लिहिताना कॉपी केलेला मजकूर मसुद्याच्या खिडकीत चिकटवण्यापूर्वी सगळी अक्षरे रोमन मधे आली पण मजकूर चिकटवण्यासाठी माऊसचे बटण दाबल्यावर मात्र जादूसारखी देवनागरी अक्षरे यायला लागली. कदाचित मजकुराच्या खिडकीच्या इनिशिअलायझेशन साठी माऊस क्लिक इव्हेंटची गरज असेल.
अजून एक प्रकार म्हणजे पान उघडून ठेवलं आणि शीर्षक लिहून झाल्यावर बऱ्याच वेळाने मजकूर लिहायला घेतला तर देवनागरी अक्षरे उमटत नाहीत रोमन अक्षरे उमटतात.
या दोन्ही प्रसंगांमधे पान ताजेतवाने केल्यावरच देवनागरी अक्षरे मिळू शकली. पण पान ताजेतवाने केल्यामुळे आधी लिहिलेला मजकूर गेला आणि पुन्हा लिहावा लागला.
हा तांत्रिक दोष दूर करण्याच्या कामी काही मदत हवी असल्यास मला मदत करायची इच्छा आहे. जरूर कळवावे.
आभारी आहे.
--अदिती