छान. मलाही माझ्या आईच्या हातच्या पाटवड्यांची आठवण झाली. माझी आई पुजानी सांगितल्याप्रमाणे करते  व वरून खोबरं व खसखस पण टाकायची. एखाद्या दिवशी भाजी नसेल तर तोंडी लावणं म्हणून केल जायचं. इकडे विदर्भात पाटवडीचा रस्सा प्रसिद्ध आहे. तेलाची फोडणी करून त्यात बारीक चिरलेला कांदा आलं-लसूण, खसखस-खोबरं थोडा गरम मसाला व तिखट घालून रस्सा करायचा व वेळेवर पाटवड्या व कोथिंबीर घालून वाढायचा.