माझ्या माहितीप्रमाणे हा चित्रपट (स्टीफन किंगच्या?) याच नावाच्या एका पुस्तकावर आधारित आहे. पुस्तकातील बरेचसे प्रसंग जसेच्या तसे चित्रपटात घेतले ेआहेत.
मला स्वतःला चित्रपट पाहण्यापूर्वी सर्व कथा माहिती होती तरीही चित्रपटाचा आनंद तसूभरही कमी झाला नाही. त्यामुळे मी चित्रपटाचा शेवट इथे उघड केला.
मात्र चित्रपटाचा शेवट इथे सांगायला नको होता असे मलाही आता वाटत आहे. पुढच्या लेखनात अशी काळजी अवश्य घेईन.
मागे काही दिवस मनोगत बंद असल्यामुळे/व्यवस्थित चालू नसल्यामुळे/मी वापरत असताना वाचनमात्र असल्यामुळे 'माणसे:...' चे पुढचे भाग देण्यात खंड पडला. आता पुन्हा काम चालू करतो.