मतल्याने घातलेले बंधन इतर शेरात पूर्णपणे निभावलेले नाही. पुढील काही शेर
'त' कारांत काफिया न घेता स्वरकाफिया घेऊन आले आहेत असे वाटले.
आपण याविषयी अधिक खुलासा करावा ही विनंती.
ही गझल सुपूर्त करताना ती दोन कारणांमुळे विवादास्पद ठरू शकते ह्याची मला कल्पना होती. त्याविषयी तळटीप देऊन ठेवण्याचा विचारही केला होता. मग ठरवलं की जर कोणी शंका उपस्थित केली तर स्पष्टीकरण द्यावे.
- हो, ही स्वर काफ़ियाची गझल आहे. मराठीत स्वर काफ़िया वापरण्यावरून गझलकारांमध्ये मतभेद आहेत हे मला माहित आहे. माझा या विषयाचा सखोल अभ्यास नाही परंतु दोन्ही बाजूचे मुद्दे मी ऐकले-वाचले आहेत. व्यक्तिश: स्वर काफ़िया न वापरण्याच्या बाजूचे मुद्दे मला पटले नाहीत व म्हणून मी तो वापरतो. असं करणारा मी काही एकटा नाही. उर्दू/हिंदीत चालणारा स्वर काफ़िया मराठीत वर्ज्य ठरवणे अतार्किक वाटतं.
- मतल्यातच अलामतीतून सूट घेऊन ह्या गझलेस अलामतीच्या बंधनातून मुक्त ठेवले आहे. ...तृप्त होत नाही/...संन्यस्त होत नाही. ह्या विषयावर मनोगतावर मागेही चर्चा झालेली आहे.
स्वर काफ़िया व अलामतीतून सूट हे दोन्ही दाखवणारे उदाहरण म्हणून कफ़ील अहमदाबादी यांच्या पंकज उधास यांनी गायलेल्या गझलेचे पहिले दोन शेर देत आहे :
धूल चेहरे पर जमी थी, दिल उस्का मैला ना था
आदमी अच्छा था लेकिन हमने पेहचाना ना था
दाद दूं हिम्मत पे उसकी या उसे पत्थर कहूं
वो मुहब्बत में मेरी तरह रोया ना था