मिलिन्दपंत,
सुंदर गझल.. त्यातले शब्द आणि अर्थ दोन्ही आवडले.

मतला अप्रतिम आहे.
का मोसमी झरा हा गंगौघ होत नाही?
तसंच
एका विभावरीचे* आयुष्य होत नाही         
आणि काळे मणी इ. शेर अतिशय आवडले.

'अलामत' बद्दलचा तुमचा मुद्दा पटला. तो मराठीतही कै. भटांपासून सर्वांनी मांडला आहे.

स्वर-काफ़ियांच्या गझलाही मी अनेक गझलकारांच्याकडून ऐकल्या आहेत. (उदा. श्री. मनोहर रणपिसे. त्यांची 'तोतया'/ 'चेहरा' असे काफियाचे शब्द असलेली गझल थोडी-थोडी आठवतेय.)

मी स्वतः आत्तापर्यंत तरी हा प्रकार टाळला आहे; पण उर्दूत तो चालतो तर मराठीत का चालू नये हा मुद्दा योग्य आहे. कारण गझल उर्दूकडूनच आपल्याकडे आली आहे.

- कुमार