प्रिय चित्त,
डॉक्टरचा डोस कडू असला तरी नाक दाबून प्यायलाच हवा! नाहीतर प्रकृती सुधारणार कशी? (प्रकृती काय प्रकृती? नट्टा-पट्टा कसला करतोयस,मिलिंदा? साधा, सोपा 'तब्येत' शब्द वापरता येत नाही का?)

सुंदर बाईला आपले सौंदर्य ठसविण्यासाठी नट्टाफट्टा करण्याची गरज नसते.

बाई अगदी अप्सरा, लावण्यखणी असली तरी थोडसं तरी प्रसाधन करतेच ना? सौंदर्यवती हिरकणी काय किंवा कविता काय,त्यांना अलंकारांची शोरूम बनवू नये हे खरं पण अगदी लंकेची पार्वती का
करावी ? मोजक्या अलंकारांने, किंचित रंग-रंगोटीने (प्रसाधन, श्रुंगार वगैरे लिहिता-लिहिता वेळीच सावध झालो) रूप खुलवलं तर बिघडलं कुठे?