हा काळा मणी आणि वृत्ती म्हणजे काय? जादूटोण्याशी शेराचा संबंध आहेशी शंका आहे. काळा मणी म्हणजे डोळे काय?
या शेराचा मला लागलेला अर्थ पुढीलप्रमाणे: (चुकत असल्यास मिलिंदरावांनी आवश्यक सुधारणा करावी)
काळे मणी हे मंगळसूत्र नि त्यायोगे येणारे दीर्घ नाते सूचित करीत आहेत. पण या नात्याचे भान,त्याची बूज़ न ठेवता बाहेरख्याली मर्द नज़रा इतरत्र स्त्रीसौख्य धुंडाळण्यापासून वंचित होत नाहीत. त्यांच्या या वृत्तीला मंगळसूत्रही बंधन घालू शकत नाही.
जादूटोणा अगर डोळ्यांशी संबंध नसावा,असे वाटते.