उत्तम परीक्षण. 'सॅल्वेशन लाइज विदिन' हे वाक्य या चित्रपटाचे सार म्हणून सांगता येईल. अलंकारिक अर्थाने (तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार) आणि शब्दशः (बायबलच्या पुस्तकाचा चलाखीने केलेला वापर) या दोन्ही प्रकारे हे वाक्य या चित्रपटात वारंवार अधोरेखित होत राहते. 'आशा नाम मनुष्याणाम् काचिदाश्चर्यशृंखला...' ची प्रचीती देणारा चित्रपट.