पुलस्ति,
गझल आवडली.
आज कोण्या प्रेषिताच्या मागुती लपशील देवा?
झिंगले त्यांच्याच वेड्या वारसांचे पीक आहे.
सुंदर.
देव किंवा दैत्य हा केवळ प्रमाणाचा फरक, बघ
हे
देव किंवा दैत्य केवळ बघ प्रमाणाचा फरक हा
असे केल्यास अधिक लयीत वाटतं का? यतिभंग टळेल.
मी जसा आहे तसा कोणीच का ना ओळखावे?
का सभोती आंधळ्या या आरशांचे पीक आहे?
अप्रतिम!
अभिनंदन.