लाविले मी बी कशाचे, हे कशाचे पीक आहे?
वाव्वा! ही ओळ फारच आवडली. गझलेतल्या भावना पोचल्या.

           एकंदर गझलेत यमकांनी(काफ़िया) अन्त्ययमकाला(रदीफ) नीट निभावलेले नाही.  मदरशांचे पीक ठीक आहे.  थोडक्यात सशांचे पीक, आरशांचे पीक, कोळशांचे पीक आदी पिके ह्या जमिनीवर पिकली आहेत.अज़ून दिशांचे, घशांचे , मिशांचे अन्त्ययमक पीकही घेता येईल. कुठलेही पीक घ्यायला हरकत नाही पण यमकानंतर अंत्ययमक अगदी सहज आल्यासारखे वाटायला हवे. असो.
        गंमतीचा भाग जाऊ द्या. मुद्दा असा, की पीक आहे सारखे कठीण अन्त्ययमक आल्याने गझलेची जमीन तंग होते. अशावेळी रदीफ नीट निभावण्यासाठी प्रतिभेशिवाय सरावसाध्य कसबदेखील लागते हे खरे.
        तुम्ही हे धाडस केले ह्यासाठी तुमचे खरोखर कौतुक करावेसे वाटते. शुभेच्छा. लिहीत रहा.

चित्तरंजन