अनामिका,
मुक्त चिंतन खूप आवडलं.
नवरा किंवा मुलं घरी नसतील तर साग्रसंगीत स्वयपाक न करणाऱ्या खूप बायका मी पाहिल्यात. (कदाचित रोजच्या कामातून तेव्हढीच सुटका.. असाही विचार त्या मागे असू शकेल) रोजचा स्वयपाकही त्या घरातल्यांसाठी करतात स्वत: साठी नाही, मग कला प्रांताला तर सोडचिठ्ठीच! '
मी कशी होते आणि कशी झाले' या विचारांशी मिळती-जुळती एक कविता यावरून आठवली. वेळ मिळाला की मनोगतावर देईन.