अनामिका ,
तुझं हे वाक्य मला १००% पटलं.
"मला वाटतं की माणूस घरी असला की त्याला गृहीत धरलं जाणं हे स्वाभाविक आहे, पण त्यांना ते तसं न करू देणं ही प्रत्येक स्त्री ची जबाबदारी नाही का?"
परदेशात रहाणाऱ्या जवळ जवळ सगळ्याच गृहिणींची हीच तक्रार असते की त्यांना गृहित धरलं जातं.पण त्याचं एक कारण असंही आहे कि लहानपणापासून भारतीय मुलीला घर -चुल - मुल हे तिचं प्रथम प्राधान्य आहे हेच शिकवलं जातं.किंबहुना ती आपल्या आई -बहिणींना त्याच रुपात पहात असते.त्यामुळे तिची मनोवृत्ती देखिल आधी घर मग आपण अशीच होऊन जाते.
याउलट पश्चात्य देशात लहानपणापासून स्त्रीला स्वातंत्र्याची सवय व शिकवण मिळते.
माझ्यामते याचाही प्रभाव पडत असावा.