>>कोडे सोडवल्याचा आनंद नको.
मान्य.

फास बनण्याकरता काळे मणी नसून धागा असेल तर अधिक चांगले. चांगला फास बसेल.
सध्या रंगसंगती करण्याचे दिवस आहेत; काळे कपडे असतील तर बायका सर्व दागिने, व तसेच पायाताण सुद्धा घालतात. चांगले दिसत असावे . मंगळसुत्राचे काय खास मग? 

अनेक हिंदू धर्माच्या पोटजातीत स्त्रिया लग्नाआधी व नवरा गेल्यावरही गळ्यात काळी पोत घालतात . त्यात मणी असतात तर काही स्त्रियांच्या गळ्यात अशी पोत  मण्यांशिवाय बघितली आहे. ह्या शेराचा अर्थ लावताना काळे मणी म्हणजे काही ठराविक वर्गाच्या दृष्टीने काळे मणी म्हणजे मंगळसूत्र असा अर्थ घेता येईल आणि शेराचा अर्थ सहज लागेल.

कित्येक लहानग्यांच्या हाता पायात काळे मणी धाग्यात / तारेत ओवून घालतात त्यामागे त्यांना कुणाची नजर लागू नये अशी  श्रद्धा असते.
हा शेर ह्या स्थितीला सुद्धा लावता येईल , आपली स्वतःची मुले , त्यानंतर स्नेह्यांची दोन चार लहान मुले बघून, आणखी काही बागडणारी  कोपऱ्यावरील बागेतली मुले पाहिली.