अदिती,
चिकाटीने इतक्या मोठ्या कथेचा सुरेख अनुवाद करुन इथे दिल्याबद्दल आभार.
होम्सच्या लोकप्रियतेचे एक कारण म्हणजे त्याची तीक्ष्ण व तल्लख बुद्धी. एखाद्या वस्ताऱ्याच्या पात्याप्रमाणे तेज असा त्याचा मेंदू, गोष्टींचा कार्यकारणभाव लावण्याची त्याची अलौकिक क्षमता आणि अपार कष्ट करण्याची त्याची तयारी. दोन वेगवेगळ्या विषयांवर एकाच वेळी विचार करण्याची होम्सची क्षमताही अफलातून. होम्सचे हळुवार मनही क्वचित प्रसंगी प्रकट होते. या सगळ्यासकट एक भारावून टाकणारे व्यक्तिमत्व म्हणजे शेरलॉक होम्स. जेरमी ब्रेटने साकारलेला होम्स पाहून खरा होम्स असाच असावा असे वाटते!
अवांतर: होम्स वाचणेही आता कालबाह्य झाले आहे काय? माझ्या पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एकानेही होम्सची एकही कथा वा कादंबरी वाचलेली नाही!