आज पहिल्यांदा पाचवा भाग वाचला आणि मग आधीचे सगळे भाग वाचून होईपर्यंत संगणकाच्या पडद्यावर नजर खिळून राहिली. तेरा- चौदा वर्षांपूर्वी आखातात काढलेले दिवस आठवले. 'माफी मुश्किल, झेन, तयीब, कैफ हालक, सियारा...' हे सगळे आठवले. 'कामाची जुपी' हा खास कोल्लापुरी शब्द 'तिकडच्या' आठवणी जागवून गेला.
बाकी सर्व विशेषणे आधीच वापरुन झालेली आहेत. त्यामुळे त्या सगळ्याशी मी 'सहमत' आहे, एवढेच तूर्त म्हणतो.
पुढच्या वाचनासाठी उत्सुक आहे. बँकेतील अनुभवांविषयी 'मी दादरकर' यांना मी 'या अनुभवांचे चांगले पुस्तक होऊ शकेल' असे लिहिले होते. तुम्हालाही तेच सांगावेसे वाटते.