मी फूलं घेऊन ओंजळीत
ते काटयांसारखे बोचू पाहतात
मी टाचनी घेऊन हातात
ते तलवारीन भोसकू पाहतात
मी सकाळचं इवलासा दव
ते उल्कासारखे कोसळतात
मी न खवळलेला समुद्र
ते सुनामी होऊन उसळतात
मी सत्य दाखवणारा आरसा
ते दगड घेऊन धावतात
मी शांत तेवणारा दिपक
ते तेलालाच आग लावतात
मी नितळ, हळूवार सांज वारा
ते वादळं होऊन पेटतात
मी नेत्रांना सुखवणारं काजळं
ते अंधत्व वाटतात
मी चिऊ, मैनेला दाने घालतो
ते प्रेतं खणून गिदाडं बोलवतात
मी भोजनात अमृत मिसळवतो
ते त्यात विष कालवतात
सनिल पांगे