हल्ली परिस्थिती बदललेली असावी.
आपणांस एकाद्या विवाहसंस्थेचा वाईट अनुभव आल्यास सर्वच संस्था अश्यातल्या नाहीत किंवा सर्वच संस्था प्रामाणिकही नाहीत हे लक्षांत घ्यावे.
ऑन-लाईन (महाजालावर) अनेक संकेतस्थळे आहेत जेथून वधू वर सुचक मंडळे चालवली जातात. माझ्या मामेभावाचे लग्न ह्याच पद्धतीने झाले आहे.
परंतु तरीही मागे एका प्रतिसादात मी स्पष्ट पणे सांगीतले होते की कुठलेही वधूवर सुचक मंडळ आपणांस फक्त स्थळे सुचवतील परंतु बाकी सोपस्कार आपण स्वत:च डोळे उघडे ठेवून पार पाडावेत.
मी स्वत: प्रेमविवाह केला आहे व महाजालाशी जवळून परिचित आहे तरीही सांगू इच्छीतो की, जुन्या काळांत पूर्ण चौकशीअंती किंवा फक्त ओळखीतच विवाह जमवले जायचे त्याचीही योग्य कारणे होतीच.
बाकी सर्व आपल्या स्वभावावर व थोडेसे आपल्या प्राक्तनावर अवलंबून असते असे वाटते -
कधी प्रेमविवाह ही फसतात तर कधी आयुष्य भर टिकतात (आपल्याच आजी आजोबांचे/आईवडिलांचे उदाहरण घेतल्यास)
पण अपवाद किंवा निमय हे ह्या गोष्टींना लागू होत नसावेत.