वा रावसाहेब,

तुम्हीही भाताचे प्रेमी हे पाहून बरे वाटले. रात्री ताक भात/ दही भात व कढी भात असे काहीच नसेल तर जेवल्यासारखे वाटत नाही. मद्राशी लोक पार पिळून काढत रसम/ सांबाराचे ओघळ कोपारापर्यंत आणतात ते वाईट पण भात काट्या-चमच्याने खाणेही तितकेच वाईट. भाताचा घास घेताना मधल्या बोटाचा स्पर्श जीभेला जाणवला पाहिजे!

<शाकाहार, आरोग्य, हिंदू संस्कृती आणि मुगल साम्राज्य अशा शेंड्या धारण करणारे उग्र आठ्याळ पंचेधारी आचार्य पंचक्रोशीतही नसावेत>

बिर्याणी खाताना यांची आठवण तरी कशी होते तुम्हाला? मी तर शाकाहारी, पण ईदेला न चुकता गुलाम-माशूकच्या घरच्या घमघमती बिर्याणी अपरिहार्यच. तिथे जाउन बाहेरुन मागवलेली उडप्याकडची शाकाहारी बिर्याणी खायची म्हणजे श्रीनगरला जाउन 'बाहेर गार आहे बा!' असे म्हणत घरात शाली पांघरून बसण्यासारखे आहे. मी मस्तपैकी दोन खवय्याना दोन बाजूला घेउन बसतो. ते मटण काढून घेतात, मग मी बिर्याणी खातो:)

पण रावसाहेब, भातावर इतके लिहुनही पापडाचा उल्लेख करायला विसरलात हे बरे नाही हो. तो हवाच हवा.

सुरेख लेख, आवडला.