'कुठेतरी चार सुखाचे घास खायला मिळावेत..' अशी कामना करणाऱ्यांना घास म्हणजे भाताचेच घास - मग तो दही भात असो की बिर्याणी - अभिप्रेत असावेत अशी माझी धारणा आहे!

होय नक्कीच..मला सुद्धा असेच वाटते. (भाकरी-पोळी वगैरे जेवल्यावर शेवटी भात खाल्ला की मगच 'जेवण सुखाचे झाले' अशी भावना येते :)

लेख मस्तच. भाताला खरोखरीच महत्त्व आहे, आपण छानच प्रकट केलेत. कन्नडामध्ये तर भाताला 'अन्ना' असेच म्हणतात (असे वाटते).

येथे शांता शेळके यांच्या कवितेतल्या काही ओळी आठवल्या. जशा आठवत आहेत तश्या लिहितो.
लहानपणी आई दूधभात भरवायची
त्याला होती अमृताची चव आणि चांदण्यांचा रंग..
....

-- (दहिभात प्रेमी) लिखाळ.