वा! नामाख्यान मजेशीर आहे.

प्रधान, देब(देव), रा‌ऊत, भुजबळ, नायक (आपल्याकडच्या ना‌ईकसारखे) अशी महाराष्ट्रातील काही आडनावे इथे आढळतात.

यावरून एक प्रसंग आठवला. रश्मिता प्रधान असे नाव असेलेली, चारचौघींपेक्षा दिसायला बरी अशी आमची उडिया (की ओरिसी?) सहकर्मचारिणी (!) होती. चारचौघींपेक्षा दिसायला बरी असूनही चार चौघींसारखीच वागते यावरून ती मराठी नसावी हे चाणाक्ष लोकांनी बरोबर ओळखले होते पण आमच्या एका मराठी सहकर्मचाऱ्याला राहावले नाही आणि त्याने जाऊन तिच्याशी मराठीत बोलायला सुरूवात केली. त्यावर तिचा झालेला गोंधळ, आमच्या सहकर्मचाऱ्याचा पडलेला चेहरा आणि एकूणच प्रसंग अगदी मजेशीर झाला होता.