रावसाहेब,

भात फ़क्कड ज़मला आहे. लेखनशैली आवडली; आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे अशा साध्यासोप्या लेखातूनही आमच्यासारख्यांच्या चवीला हात घातलात, याचे जास्त कौतुक वाटले. दहीभात तर मला पुन्हा भारतात घेऊन गेला. अहाहाहा!!!! लेख वाचूनच तोंडाला पाणी सुटले नि इकडे राहून कशाला मुकतोय,याची ज़ाणीव झाली, यातच लेखाचे यश आले. पण या विविध प्रकारच्या भातात आमच्या लाडक्या नागपुरी वडाभातावर नि रावणभातावर का बरं अन्याय? असो.

अमेरिकेत मिळणाऱ्या मेक्सिकन खाद्यपदार्थांमध्ये 'ज़ेस्टी चिकन बोल' नावाचा ज़ो एक पदार्थ मिळतो त्यात, तसेच काही वेळा 'वेजी बरिटो' मध्येही भात वापरल्याचे अनुभवले आहे. पण त्याची चव 'उकडलेला तांदूळ' यापलीकडे ज़ात नाही, याचीच राहून राहून खंत वाटते. काही वेळा शिज़वलेली चवळी (कडधान्य) वगैरेसुद्धा भातात घातलेली बघायला मिळते नि येथील खाद्यसंस्कृतीच्या अपूर्णतेची दया येते. त्या तुलनेत भारतीय खाद्यजीवन किती समृद्ध आहे, हे ज़ाणवते नि उकडलेल्या भातासारखेच आमचे भारतीय खाद्यप्रेमही फ़ुलून येते :)