मुशायरा चांगला झाला. कार्यक्रमाला बऱ्यापैकी गर्दी होती. कार्यक्रम अगदी नेटका झाला. सारंग२३, वैभव जोशी आणि प्रसाद शिरगांवकर हे कविमित्र आवर्ज़ून उपस्थित होते.अस्मादिकांना चांगली दाद आणि तुटक्या हाताची सहानुभूतीही मिळाली. वर ५०० रुपये मानधनही मिळाले.
अशा चार गझला सादर केल्या. इतरांच्याही गझलाही चांगल्या झाल्या. कविवर्य प्रदीप निफाडकर ह्यांच्या "माझी मुलगी" गझलेला विशेष दाद मिळाली.