<<मी स्वत: काही संकल्प सोडलेत....
मराठी भाषीकांनी इंग्रजाळलेले मराठी वापरण्याऐवजी स्वत:ची बोली स्वत:च्या लेखनांत आणावी ह्याबद्दल आग्रह करीत असतो....
जेथवर शक्य आहे तेथवर हा गाडा ओढण्याचे ठरवलेय....>>
माधवराव,
अभिनंदन. मीही याच प्रयत्नात आहे. असे करताना विचित्र अनुभव येतो खरा. दुर्दैवाने शुद्ध मराठी (म्हणजे केकला गोड ढोकळा वा सँड्विच ला भरलेला पाव इतका अतिरेक नाही) बोललो तर अनेकदा मराठी माणसेच आपल्याकडे 'कोण हा नमुना' अशा नजरेने पाहताना आढळतात.
एकवेळ शिक्षण इंग्रजीमाध्यमातून होणे वा कचेरीत सतत परभाषेत बोलावे लागल्याने तोंडात अनेक इंग्रजी शब्द येउ शकतात, पण तेही टाळता येतात. मात्र मराठी लोक पाळलेलया कुत्र्याशी इंग्रजीत का बोलतात? माझ्या निरिक्षणानुसार आपण वरच्या वर्गात वावरतो, आपण सुमार मध्यमवर्गिय नाही, आपली उच्चभ्रू लोकात उठबस आहे हे दाखवण्यासाठी अनेक मराठी माणसे विनाकारण इंग्रजीने लडबडलेले मराठी बोलतात, यात मराठी अभिनेते/ अभिनेत्र्या प्रकर्षाने दिसून येतात. ई टिव्ही मराठी वाहिनीवर मानाचा मुजरा नमक एक मराठी (?)कार्यक्रम रविवारी दुपारी असतो. कवीता पौडवाल संचालन करताना अधुन मधुन मराठीही बोलायची!
असो. आपण तरी मराठीच बोलायचा कसोशीने प्रयत्न करू. अगदी नाइलाजच असेल तर दुसरी भाषा वापरायला हरकत नाही पण निदान दोन मराठी मित्रांनी तरी एकमेकाला भेटल्यावर 'क्या यार किधर है तू?" असे तरी बोलू नये.