चांगले उतरले आहे. दोन्ही भाग एकदम वाचले. पहिला भाग अधिक चित्रदर्शी तसेच गमतीशीरही वाटला.

या लेखनाच्या अनुषंगाने पुढे आलेले बरेच विचार कळले. काही पूर्ण पटले.

जर आपल्याला हया समाजात रहायचं असेल तर या सगळ्याचा सामना करावाच लागेलं

हे तितकेसे पटले नाही. 'मियाबिवी राज़ी तो क्या करेगा काज़ी' या न्यायाने म्हणा किंवा वैचारीक प्रगल्भता, परस्पर सामंजस्य नि कौटुंबिक पाठबळ यांच्या ज़ोरावर म्हणा, एकूणच या बाबतीत 'समाज' हा दुय्यम घटक ठरतो,असे वाटते. लग्न समाजाला/समाजाशी नाही, तर संबंधित मुलामुलीस करायचे आहे. भारतीय समाजमनाच्या दृष्टिकोनातून कदाचित हे धाडसी वक्तव्य ठरेल; पण तार्किकदृष्ट्या चूक नक्कीच वाटत नाही.

नाहितर मग लोकं काय म्हणतील याचा विचार नं करता आपापल्या अपेक्षांना धरुन रहावं आणि तेव्हाच जोडीदार निवडावा जेव्हा तो मनासारखा मिळेल

यात सुदैवाचाही बराच वाटा असतो,असे वाटते. नाहीतर अशा 'सुयोग्य' ज़ोडीदाराच्या शोधात 'किती थांबायचं', याचा एकदा विचार चालू झाला, की मग अपेक्षांना मुरड घालणे वगैरे आपसूकच येते, असे वाटते. कदाचित त्यावेळीच केवळ 'समाज काय म्हणेल याची पर्वा न करता...' किंवा 'मियाबिवी राज़ी...' पेक्षा उपरोल्लेखित घटक (वैचारीक प्रगल्भता, परस्पर सामंजस्य नि कौटुंबिक पाठबळ) जास्त महत्त्वाचे ठरत असावेत.

पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.