अशांतता, अबोले, बदलणे आवडले. गज़ल आवडली.
मक्त्यात पुन्हा असताना 'आलेच' मधील च भरीचा वाटतो ,वाटेस येणे खटकते.
तिची सावली, तो कवडसा ह्यांची मिठी समजली. मिठी मारणारी ती असावी; क्रियापद 'होते' असे आहे. त्यामुळे तसे असेल तर शेरातील नात्याचा बोध स्पष्ट नाही. हा शेर अधिक स्पष्ट  करता येईल. हा शेर फांदी, पाने, कवडसा, आई मुलगी, दोन बहिणी ..नक्की कुणाला उद्देशून आहे ते स्पष्ट झाले नाही.