मी स्वत: काही संकल्प सोडलेत....
मराठी भाषीकांनी इंग्रजाळलेले मराठी वापरण्याऐवजी स्वत:ची बोली स्वत:च्या लेखनांत आणावी ह्याबद्दल आग्रह करीत असतो....
जेथवर शक्य आहे तेथवर हा गाडा ओढण्याचे ठरवलेय....>>
मलाही असेच वाटते. घरी आम्ही शक्यतो पूर्ण शुद्ध मराठीच बोलतो. पण बाहेर शुद्ध मराठी बोलायला गेले तर सर्वसाक्षी म्हणतात तसे अनुभव येतात कधीकधी.
अशाच हल्लीच्या एका लग्नात नवऱ्यामुलाला 'अभिनंदन' म्हटले तर तो बघतच राहिला. मग म्हणाला, 'मला अर्थ कळला तू काय म्हणालीस त्याचा, पण मराठीत थँक्यू ला काय शब्द आहे ते आठवत होतो.'