अरुणजी,

आपले इतर अनुभवस्वरूपी सुंदर लेखन आम्ही सर्वजण हल्ली आवडीने वाचतोच आहोत.
पण सौरभ यांच्या प्रश्नांच्या निमित्ताने आम्हा (या बाबतीतल्या जिज्ञासू) मनोगतींना आपल्यासारख्या ज्योतिषशास्त्राच्या जाणकाराचा लाभ झाला हा आमचा शुभयोग. एका अभ्यासकाचे मौन मोडले गेले तरी आमचा फायदा झाला.
आपल्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू पाहून आनंद वाटला आणि आता या विषयीचे प्रश्न कोणाला विचारावेत याचेही उत्तर मिळाले.
अशीच माहिती उत्तरोत्तर देत जावी व शक्य झाल्यास ज्योतिषशास्त्रावरही एखादी स्वतंत्र लेखमाला लिहावी अशी विनंती/अपेक्षा करतो.

दिगम्भा