ओरियावर बंगालीचा चांगलाच प्रभाव आहे असे वाटते.
ओरिसा आणि बंगाल यांच्यामध्ये बरीच साम्यस्थळे आहेत असे आपण म्हणूया. कारण कोणाचा कोणावर प्रभाव ह्या बाबतीत ह्या दोन्ही राज्यातील लोकांमध्ये मतभेद आहेत!
तुम्ही लिहिलेली आडनावे मी ओरिया लोकांमध्ये ऐकली नाहीत. पण पूजा (विशेषतः दुर्गापूजा), व्रतवैकल्ये, शुभकार्यात शंख वाजवणे, सुवासिनींनी भांगात सिंदूर भरणे, छन्याच्या (पनीरच्या) मिठाया, स्टँडर्ड फोडणीसाठी पाच फुटण (मोहरी, जिरे, मेथी, बडीशेप आणि कांद्याचे बी) वापरणे, बालनावे* इत्यादी दोन्ही प्रांतात आढळते. भाषांमध्ये तर खूपच साम्य आहे.(*पेटनेमसाठी वापरलेला बालनावे हा शब्द आवडला)