तिच्या सावलीला मिठी मारलेल्या मला' मी कवडशांमध्ये पाहिले होते, असाही एक अर्थाचा पदर या शेराला आहे हे पटले पण तो मी नंतरच्या ओळीत आला आहे त्यामुळे गोंधळ झाला. म्हणून शेर अधिक स्पष्ट करावा म्हणजे त्या कल्पनेला वाचकांपर्यंत नेता येईल.

सावली- सतत सोबत राहणारी असा अर्थ न घेता, फक्त प्रकाशात माणसाची सोबत करणारी आहे, त्याकडे हरवलेली/ अनिश्चित व साथ सोडणारी या अर्थानेही बघता येईल. त्यामुळे आपल्याला मनात असणारा अर्थ तेवढा स्पष्ट झाला नाही किंवा शेरात आपल्याला काय म्हणायचे आहे ते जाणून घ्यावेसे वाटले. सावलीला मिठी मारणे मध्ये हाती न येणाऱ्या गोष्टीच्या मागे जाणे असे सुद्धा होईल का? शेराला एक वेग़ळा अर्थ मिळेल

(च वरून काही आठवणींना उजला मिळणार असेल  तर तसे भरीचे वाटणारे च वापरू नका( ह. घ्या.  )