फोडणीत लाल सुक्या मिरच्या ,  हिरव्या मिरच्या व जीरे, हिंग, हळद घालून त्यात मुगाची थोडी डाळ घालणे. डाळ आधी भिजत घालणे १ तास म्हणजे मग ती लगेच शिजेल. नंतर लगेच दुधीच्या फोडी घालून दुधी शिजवणे. नंतर दूध घालणे. आपण रस भाजी करतो तेव्हा पाणी घालतो तर या भाजीला पाण्याऐवजी दूध घालणे. नंतर त्यात थोडी चवीला साखर, मीठ, दाण्याचे कूट, ओल्या नारळाचा खव कोथिंबीर घालून दाट भाजी तयार होईल.