पुलस्ति,

गझल छान आहे. विशेषतः

जरी शांत आता, पहारे असू द्या -
इथे सर्वकाही अकस्मात होते!

खरी वेळ येता म्हणे "कुंजरोवा"!
असे सत्यवादी समाजात होते

पुढे षंढ गांडीव मागे लपावे?
कधी शुद्ध सामर्थ्य कोणात होते

शहाण्यात ज्यांना कुणी मोजले ना
मला तेच वेडावुनी जात होते

हे शेर खूपच चांगले उतरले आहेत. धर्मराजाला उद्देशून रचलेला शेर मलाही काहीशा वेगळ्या प्रकारे सुचला होत; दुर्दैवाने त्याला अपेक्षित मूर्त स्वरूप आले नाही  ३,४ अधिक चांगले आणि ५ अधिक स्पष्ट होऊ शकला असता, असे मला वाटते. एकूण गझल आवडली. पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.