दिगम्भा,
ओडिया लिपीबद्दलचे तुमचे निरीक्षण/ माहिती अचूक आहे. प्राचीन संस्कृतीच्या संदर्भाबद्दल जरा माहिती काढून लिहावे लागेल. भाषेवर संस्कृतचा खूप प्रभाव आहे हे मात्र निश्चित.

ढगांसाठी मेघ, पावसासाठी बर्षा, तापासाठी(fever) ज्वर, थंडीसाठी शीत हे शब्द बोलीभाषेत वापरले जातात. अगदी मोलकरणी वगैरे सुद्धा हेच शब्द वापरतात. 'वाईट वाटलं' यासाठी 'मनाला दुःख झालं' अशी वाक्यरचना सरसकट केली जाते. 'एकदम आवाज झाला' ह्यासाठी 'हटात् शब्द हेला' असे अल्पशिक्षितही सहज बोलताना सुद्धा म्हणतात.  (संस्कृतमध्ये आणि संस्कृतप्रभावित हिंदीमध्ये आवाज यासाठी शब्द हा शब्द बरेचदा वापरलेला माझ्या वाचण्यात आला आहे.)

-मीराताई