ऋतू येत होते ऋतू जात होते
तरी गुंग मी रंग-ढंगात होते

ठीक.

उगा सांगता का कथा रावणाच्या
असे आजच्या ही जमान्यात होते

आजच्याही. बाकी चांगला.

जरी खात लालू इथे 'घास' आहे
कशी रेलवे आज स्वस्तात होते?

रेलवे इंग्रजी. घासचा श्लेष अमराठी. खारिज.

रिकामीच मैफ़िल पहा जाहलेली
असे 'दर्द-गाणे' कुणी गात होते

च अनावश्यक. विनोद स्पष्ट होत नाही. ओळखावा लागतो.

मला आरसा आज कोठे मिळावा?
किती ओतले तेल केसात होते

कल्पना स्पष्ट होत नाही.

जरा शांत आता, पहाटे निजू द्या 
सुरू जंग रात्री अकस्मात होते!

ठीक.

अशी वेळ येता कुठे सांग जावे
न जाता फजीती समाजात होते

फजीती अशुद्ध. खारिज.

चढे षंढ गाडीत, त्याला भिडावे
इथे येव्हढे धैर्य कोणात होते!

ठीक.

शहाण्यात माला कुणी मोजले हो?
इथे सर्व वेडे अभिजात होते

माला??? अभिजात वृत्तात बसत नाही. खारिज.

अता "केशवा" रोजची बात आहे
विडंबन कसे हे झटक्यात होते

झटक्यात वृत्तात चुकले. झपाट्यात होते म्हणा.

विडंबने चांगली आहेत पण आता इतकी केल्यावर वृत्ताच्या चुका अजिबात शोभत नाहीत बुवा.