ऋतू येत होते ऋतू ज़ात होते
बदलणे तुझ्याही स्वभावात होते
ठीक.

खुलाशातही प्रश्न मांडून गेले
अबोले तसे फार वाह्यात होते
खुलासा असेल तर अबोले कसे?

मिरवले तुझे घाव मी राजबिंडे
(विव्हळणेसुद्धा बघ दिमाखात होते)
मी राजबिंडा की घाव राजबिंडे. राजबिंडे घाव काही खास नाही बुवा. पण दिमाखात छान आहे.

तिच्या सावलीला मिठी मारलेल्या
मला पाहिले मी कवडशात होते
अस्पष्ट

ज़रा ज़ुंपले आज़ माझे मनाशी
(नको शांतता 'आतल्याआत' होते)
काफियाची जागा चुकली.

पुन्हा दैव आलेच वाटेस माझ्या
पुन्हा त्यापुढे टेकले हात होते
पुन्हा तेच. काफियाची जागा चुकली. गझल चांगली आहे पण असे शेर गझलेची किंमत कमी करतात बुवा.