ओढणी, पसारा आणि मक्ता सगळ्यात जास्त आवडले. नव्याने नवे होणे, नव्याने पिणारे हज़ारात असणे, या कल्पना छान वाटल्या. पसाऱ्याची वरची ओळ सध्याच्या ऐवजी 'पसारा किती हा इथे मांडला मी' अशी केल्यास जास्त प्रवाही वाटेल, असे मला वाटते.

कधी ते प्रख्यात मेघ कुठे बरसल्याचे ऐकले नाही, या अर्थाने तो शेर आला असेल, तर हा अर्थ नीट लागत नाहीये. 

'साकी'सारख्या बिगर मराठी शब्दांना मराठी गझलेत स्थान देणे, मला व्यक्तिशः पटत नाही; पण याबाबत गझलकारांचे काय मत आहे, ते ज़ाणून घ्यायला आवडेल.