मराठी माध्यमातील शाळांमध्ये विज्ञान मराठीतून शिकवले जाते. (निदान माझ्या वेळी तरी तसेच होते.) पण इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये हे शक्य होईल असे वाटत नाही.

पाठ्यपुस्तकांमध्ये प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे त्यांचा रूक्षपणा. मला विज्ञान शिकत असताना जीवशास्त्राचा भयानक कंटाळा यायचा. त्याच्या जोडीला तितक्याच कंटाळवाण्या पद्धतीने शिक्षक शिकवत असत, अगदी कॉलेजातसुद्धा. प्रत्यक्षात जीवशास्त्र हा किती मनोरंजक विषय आहे याची माझ्या शिक्षकांनी मला थोडी जरी जाणीव करून दिली असती तर मी पदार्थविज्ञानाकडे न जाता जीवशास्त्राकडे गेलो असतो. (अर्थात त्या शिक्षकांना जीवशास्त्र किती मनोरंजक वाटत होते हा मुद्दा वेगळा.)

विज्ञान मातृभाषेतून शिकल्यावर फायदा नक्कीच होइल, पण त्याचबरोबर मुलांना तो विषय मनोरंजक कसा वाटेल याचाही विचार व्हायला हवा. हे फक्त विज्ञानासाठी नाही, तर सर्व विषयांसाठी व्हायला हवे. बद्धकोष्टी समीक्षेप्रमाणे रटाळ पुस्तके असतील, तर मुलांना त्यात गोडी कशी वाटणार? परत जीवशास्त्राचे उदाहरण घेतले तर आपल्या सृष्टीची विविधता, त्यातल्या गमतीजमती याचा मागमूसही पाठ्यपुस्तकांमध्ये दिसत नाही. कदाचित अभ्यास करताना मुलांनी चुकुनही 'एन्जॉय' करता कामा नये असा कायदा महामंडळामध्ये असावा.

हॅम्लेट