चक्रपाणि,
मस्त लेख! त्यातली सहजता, सलगता आवडली. (बायको लेखनसुद्धा कसं ताळ्यावर आणते बघ!)

उदाहरणंही सुंदर वापरली आहेस. परीकथा, मुंज, चित्रपट, महाविद्यालयीन दिवस, लग्नानंतरचा (अपेक्षित?) घटनाक्रम - सगळंच अगदी सुंदर साधलं आहेस.

एखादा विषय घेऊन निबंध लिहिता येऊ शकतो आणि तो (दहावीच्या मराठीच्या परीक्षेसाठी लिहायचा नसल्यामुळे? -  ह. घ्या.) कसा नानाविध प्रकारे खुलवता येऊ शकतो याचं तुझा लेख हे उत्तम उदाहरण वाटतं. (पु. लं. चा 'उरलं-सुरलं' मधला 'समजा तुमच्या कोणी मुस्कटीत मारली तर?' हा लेख आठवला. विषय वेगळा असला तरी या लेखन-प्रकारामुळे.)

- कुमार