खूप दिवसांपूर्वी ही चर्चा झाली होती. त्यानंतर हे पान बघण्याचे जमले नाही. त्यात मनोगताने मध्येच डुबकी खाल्ली. आता मराठी विकिपीडियावर बेळगांव हा लेख मुखपृष्ठ सदर करण्याचा प्रस्ताव आला आहे. त्यानिमित्ताने संशोधन करताना येथे परत आलो, तर गोपाळरावांचा संदेश पाहिला. याला उत्तर देण्यामागे खपली काढण्याचा उद्देश नसून माझी भूमिका स्पष्ट करणे असा आहे. कृपया व्यकिगत हल्ले केराच्या टोपलीत परस्पर आपणच टाकावे.
तुमची नंदुरबार, माटुंगा, गोरेगाव, दामू नगर (कांदिवली पूर्व) वगैरे विषयी चर्चा वाचल्यावर तुम्हाला काय सांगायचे आहे, तेच कळत नाही आहे. माझ्या मते तुम्ही गुजरात मद्ये राहिल्यामुळे बेळगांव विषयी ज्ञान नसेल. त्याला कांही हरकत नाही. पण मुळ विषयाला बगल देवु नये
गोपाळराव, उलट गुजरातेतही राहिल्यामुळे मला या मुद्द्याची दुसरी बाजू सुद्धा माहिती आहे. जी अश्या माणसाला अशक्य आहे ज्याने आयुष्यभर बेळगांवचीच बाजू पाहिलेली आहे. तुम्ही फक्त बेळगांवचा विचार करता पण तेच (त्यातील काही हास्यास्पद) निकष नंदुरबार, माटुंगा, मोहम्मद अली रोडला लावल्यास तुमची विधाने त्यांच्या बाजूनेही करता येतील हे दाखवून देण्याचा माझ्या 'नंदुरबार, माटुंगा..इ' वाक्यांचा उद्देश होता.
असो.
क. लो. अ.
अ. ना.