ऋतू येत होते ऋतू ज़ात होते
बदलणे तुझ्याही स्वभावात होते
ठीक.
--- सहमत
खुलासा असेल तर अबोले कसे?
--- अबोले हाच खुलासा!
मी राजबिंडा की घाव राजबिंडे. राजबिंडे घाव काही खास नाही बुवा. पण दिमाखात छान आहे.
--- राजबिंडे म्हटले आहे म्हणजे घावच असावेत बुवा. मी तर मुळीच राजबिंडा वगैरे नाहीये. खात्री पटवण्यासाठी फोटो पाठवतो बुवा हवा तर!
तिच्या सावलीला मिठी मारलेल्या
मला पाहिले मी कवडशात होते
अस्पष्ट
--- कबूल
ज़रा ज़ुंपले आज़ माझे मनाशी
(नको शांतता 'आतल्याआत' होते)
काफियाची जागा चुकली.
पुन्हा दैव आलेच वाटेस माझ्या
पुन्हा त्यापुढे टेकले हात होते
पुन्हा तेच. काफियाची जागा चुकली.
--- 'काफ़ियाची ज़ागा चुकली' हे लिहायची तुमची ज़ागा चुकली.
गझल चांगली आहे पण असे शेर गझलेची किंमत कमी करतात बुवा.
--- चक्क तुम्ही 'चांगली' आहेत म्हणालात, यातच गझलेची किंमत झाली की हो. भरून पावलो. धन्यवाद.