हिंदू - मुस्लिम ऐक्य वगैरे असला कोणताही डोलारा उभा न करता प्रामाणिकपणे लिहिलेले अनुभव फार आवडले. आठवायचेच झाले तर लहानपणी घरी येणारा  मोहरमचा 'पीर'(ताबूत) आठवतो, वडीलांनी त्याला वाहिलेली चांदीची नाल आठवते, मोहरमच्या शेवटच्या दिवशी घरातून मशिदेत पाठवले जाणारे दोन घागरी सरबत आठवते, अगदी नित्यनेमाने संकष्टी - चतुर्थीचा उपास करणारे काही ज्येष्ठ मुस्लिम बांधव आठवतात.  अर्थात या सगळ्या गोष्टी भारतात हजारो वर्षांपासून राहिलेले मुस्लिम हे 'काफिर' आहेत हा साक्षात्कार राजकारण्यांना होण्यापूर्वीच्या. या सगळ्यात उर्दूची झालेली  कत्तल बाकी ईश्वर - अल्लाही 'मुआफ' करणार नाही. आता शब्दकोष वापरून गालिब समजावून घ्यावा लागतो. 'तलत, रफी, साहिर, शमशाद, नौशाद, युसुफमियाँ हे 'आपले' नाहीत, त्यांची 'कौम' वेगळी आहे' , हे ऐकून घ्यावे लागते. 'ढांचा गिरा दिया गया तो हमने भी भगवान के सामने घी के दिये जलाये थे' असे अभिमानाने सांगणाऱ्यांच्या दुनियेत रहावे लागते. या सगळ्याने कोडग्या झालेल्या मनाला समजवायला पुन्हा गालिबकडेच जावे लागते
'मुश्किलें मुझ पर पडी इतनी के आंसा हो गयी'